
देवरुखातील जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने बंद अवस्थेत….
देवरुख शहरात जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी लाखो रुपये खर्च करून निवासस्थाने उभारण्यात आली. ही निवासस्थाने सद्या बंद स्थितीत आहेत. यामुळे शासनाचा निधी पाण्यात जात असल्याचे चित्र आहे. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम सुरू असल्याने गेली तीन वर्षे रुग्णालयाचा कारभार कर्मचारी निवासस्थानांमधून हाकला जात होता. रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास गेल्याने कारभार पुन्हा नूतन इमारतीमधून सुरू झाला आहे. याला एक वर्षाचा कालावधी लोटत आला. तरी रुग्णालयाचे फलक कर्मचारी आश्चर्य व्यक्त होत आहे. निवासस्थानांवर असल्याचे चित्र आहे. कमीत कमी हे फलक काढणे गरजेचे आहे. ही बाब अधिकारी वर्गाच्या लक्षत येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.www.konkantoday.com