
जहाजांवरील कर्मचारी, अधिकार्यांच्या पेन्शनसाठी एफयूएसआयचा पाठपुरावा करण्याचा निर्धार.
गेल्या अनेक वर्षांपासून सागरी जहाजांवरील कर्मचारी/खलाशी, अधिकारी यांना त्यांच्या सेवेतून निवृत्तीनंतर निश्चिंत जीवन जगता यावे यासाठी पेन्शनच्या मागणीसाठी आवाज उठविला जात आहे. फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाने (एफयूएसआय) अनेक मोहिमांद्वारे या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला असून येत्या आठवड्यात सर्व खलाशांसाठी पेन्शनची मागणी करणारे हजारो पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठविण्याची मोहिम राबविली जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे देशातील सर्वात दीनदुबळ्या आणि असंघटित असलेल्या बांधकाम कामगारांनी पेन्शनचा हक्क मिळिवला आहे, तर मग सर्व खलाशांना पेन्शन का मिळू नये? जगभरात अनेक राष्ट्रांमध्ये सागरी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी-अधिकार्यांना व त्यांच्या कुटुबियांना निवृत्तिवेतन अर्थात पेन्शनच्या लाभाची तरतूद आहे. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना अर्थात आयएलओच्या १९४६ च्या परिषदेतील ठरावानुरूप (खङज उ०७१-शरषरीशीी’ झशपीळेपी उेर्पींशपींळेप, १९४६ (छे. ७१ समुद्री सेवेतून निवृत्तीनंतर खलाशांना पेन्शन देण्याला मान्यता दिली गेली आहे. इतकी वर्षे उपेक्षिल्या गेलेल्या या कराराचे आता तरी भारत सरकारने समर्थन करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी पंतप्रधानांना पोस्ट कार्ड पाठवून केली जाणार आहे.www.konkantoday.com