
‘नाहीतर उरले सुरले तुमचे जातील’, हे ऐकताच राऊत खवळले, ‘अरे सोड रे, कोण तू..’
*मुंबई :* उद्धव ठाकरे गटातून काढून टाकण्यात आलेले नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यासंबंधी आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “ते आमच्या पक्षात नाहीत. जे आमच्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर आम्ही का मत व्यक्त करावं? मी त्यावर मत व्यक्त करणार नाही” नाशिकचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत, पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत बोलले की, “माझ्याकडे कोणतीही नाव नाहीत. कोण कोणत्या पक्षात जातय, कोण जात नाही. नाशिकमधली शिवसेना खंबीर, अभेद्य आहे. ज्यांना जायच होतं ते गेले, ज्यांना पक्षातून दूर करायच होतं त्यांना दूर केलं. पुढच्या आठवड्यात मी नाशिकमध्ये जाईन तेव्हा मला सत्य कळेल.
आता हवेत पंतगबाजी सुरु आहे, पक्षाला अडचणीची ठरणारी जी माणस होती, त्यांना पक्षाने दूर केलं, एवढच मला माहित आहे”अजित पवार यांनी धीरुभाई अंबानींचा उल्लेख केला, त्यावरुन वाद होतोय, असं पत्रकरांनी राऊत यांना विचारलं. “अजित पवारांबद्दल चुकीच दाखवण्याची कोणाची हिम्मत आहे का? ध चा मा करायला आता आनंदीबाईंच राज्य आहे का? अजित पवावर काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं” “धीरुभाई अंबानी देशातले महत्त्वाचे उद्योगपती आहेत. आज जे रिलायन्सच साम्राज्य उभं आहे, त्याचे संस्थापक धीरुभाई आहेत. धीरुभाईंच्या मागे कधी ईडी लागली नाही, त्यांच्या कारखान्यावर जप्ती आली नाही. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं एवढच मी सांगू शकतो” असं संजय राऊत म्हणाले.
दोन दिवसावर शिवसेनेचा वर्धानपिदन आहे, दोन्ही शिवसेनेकडून तयारी सुरु आहे, त्यावर राऊत म्हणाले की, “ती शिवसेना नाही, तो शिंदेंचा गट आहे. अमित शाह त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगावर दबाव आणून अमित शाहंनी तो गट स्थापन केला. महाराष्ट्र, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी हे केलं. त्याला शिंदे बळी पडले” “हा एक गट आहे, त्यांच्याकडे भ्रष्टाचारातून जमवलेला प्रचंड पैसा आहे. एमएमआरडीएच एक टेंडर तीन हजार कोटीला निघतं. महिन्याला एमएमआरडीएची 119 टेंडर निघतात. गणित करा, हा किती कोटीचा व्यवहार असेल. हा पैसा राजकारणात माणस विकत घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी वापरतात. ही पैशाची, सत्तेची ताकद आहे. आमची ताकद प्रामाणिकपणा, निष्ठा आहे” असं संजय राऊत म्हणाले.
’*मावळच्या जनतेला पैशात तोलू नका, नाहीतर उरले सुरले तुमचे जातील असं स्थानिक आमदाराने म्हटलं. त्यावर राऊत खवळले, “अरे सोड रे, कोण तू, 100 कोटी खर्च करुन मावळच्या जनतेला विकत घेऊन तू आमदार झालास” “अजित पवारांबरोबर गेलास ना, अशा धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्ही चोर, लफगें नाही” असं राऊत म्हणाले.