
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीननेट मासेमारी १ जूनपासून बंद.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. तसेच माशांचा प्रजननाचाही काळ असतो. यामुळे मासेमारीला बंदी घालण्यात येते. दि. १ जूनपासून मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नौकांवरील जाळी उतरवून तसेच नौकांची डागडुजी करून त्या शाकारून ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. दि. ३१ मेच्या रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला असून, सुमारे पावणेतीन हजार यांत्रिकी आणि बिगरयांत्रिकी नौका मासेमारी करतात.
यातील सुमारे २५० नौका पर्ससीन नेट मासेमारी करणार्या आहेत. दि. १ ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू होते. दि. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. पर्ससीन नेट मासेमारी नौकांवर मोठ्या प्रमाणात परराज्यातील खलाशी, पागी, तांडेल कामासाठी आणले जातात. या सर्व कामगारांना १० ते २० मे पर्यंत पर्ससीन नेट नौकांवरून कार्यमुक्त करण्याचा करार नौका मालकांकडून केलेला असतो. त्यानुसार पर्ससीन नेट मासेमारी नौकांची कार्यवाही सुरू झाली आहे.www.konkantoday.com