
यंदा देखील हापूस बागायतदारांना नुकसान, आंबा उत्पादकांना शासनाने मदतीचा हात द्यावा -संघटनेची मागणी.
हवामान बदलामुळे यावर्षी हापूस आंब्यांचे उत्पादन कमी आले आहे. सन २०२२-२३ मध्ये आंबा उत्पादकांच्या शासनाच्या अधिकार्यांसोबत अनेक बैठका झाल्या. परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांना झाला नाही. आर्थिक अडचणीत आलेल्या आंबा उत्पादकांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. आंबा उत्पादक शेतकर्यांनी मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, ज्येष्ठ बागायतदार टी. एस. घवाळी, मनीष बांदिवडेकर, अल्ताफ काझी, इम्रान पावसकर, दीपक उपळेकर, बावा साळवी उपस्थित होते.
या हंगामात हापूस आंब्याचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यातच अवकाळीमुळे आंब्याला चांगलाच फटका बसला. दरही पडले असून मागणीवरही परिणाम झाला आहे. आंबा शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचे रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. आंबा पीक वाचवण्यासाठी दरवर्षी बागायतींच्या देखभालीवर अमाप खर्च औषधांवर होत आहे. यावर्षी मार्चमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मोहाराची गळती झाली. आंबा आता अखेरच्या टप्प्यात असताना, मेच्या पहिल्याच आठवडद्यात दोन दिवस झालेल्या बसला आहे.www.konkantoday.com