
जानवळे येथे आज महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव
आबलोली : बौद्धजन सहकारी संघ(रजि.) तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा (रजि.) तालुका गुहागर व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटना तालुका गुहागर या धम्म संघटनांसह शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने आज (१५ मे) तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा २५६९ वा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गुहागर तालुक्यातील जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सभा अध्यक्षस्थानी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुकाअध्यक्ष व माजी सभापती आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे सभापती सुरेश (दादा) सावंत हे भूषविणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे मुंबईचे सेक्रेटरी व बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक एस. एल. सुर्वे आणि विद्याधर राजाराम कदम हे आहेत. १५ मे रोजी महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता ध्वजारोहण होईल.
सकाळी १०.०५ ते १०:३० या वेळेत पूज्य भिक्खू विमल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध पूजापाठ घेण्यात येणार असून, दुपारी १२ ते १२.०५ या वेळेत भारतीय राज्य घटनेची प्रास्ताविका उद्देशिकेचे अनावरण केले जाईल. त्यानंतर २ वाजेपर्यंत मान्यवरांचे सत्कार आणि जाहीर अभिवादन सभा होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुहागर बौद्धजन सहकारी संघटनेचे चेअरमन मारुती मोहिते करणार असून, सम्मासंम्बुद्धचे संपादक संजय गमरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ ते ३:३० या वेळेत उपस्थित सर्वांसाठी भोजनदान होईल. सायंकाळी ४ ते ५:३० या वेळेत पूज्य भिक्खू विमल बोधी यांची धम्मदेसना होणार आहे. जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका सरचिटणीस सुनील गमरे व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे राजदत्त शिवराम कदम हे करणार आहेत.
या जयंती महोत्सवाला गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे विश्वस्त यांना विशेष करून आमंत्रित करण्यात आले आहे. या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाला गुहागर तालुक्यातील बौद्ध धम्म बंधू-भगिनी आणि बालकांनी वेळेत बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.), भारतीय बुद्ध सासन सभा (रजि.) तालुका गुहागर व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटना तालुका गुहागर यांनी केले आहे.