
चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे डंपर दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू.
चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे बुधवारी दुपारी 3.30 वाजता डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेला अपघातात दुचाकी वरील महिलेचा मृत्यू झाला डंपरने एका दुचाकीस्वार महिलेला चेंडूसारखे उडवले. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. समीना नासिम चिपळूणकर (28, खेर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचे वडील आदम चौगुले हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. अपघातानंतर या ठिकाणी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, समीना नासिम चिपळूणकर या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या. खेर्डी बाजारपेठजवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्ससमोर त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत समिना डंपरच्या चाकाखाली सापडल्याने तिच्या पोटावरून चाक गेले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील आदम चौगुले हे जखमी झाले.अपघातानंतर डंपर चालक तेथून फरार झाला.