
कृषि प्रदर्शनातून फायदा, आंबा विक्रीतून ३ दिवसात ८ लाखांचे उत्पन्न.
कृषि तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषि विकास परिषदेतील दोन सेंद्रीय आंबा स्टॉलनी विक्रमी विक्री केली आहे. एका दिवसाला अडीच ते पावणे तीन लाख असे तीन दिवसाला सुमारे ८ लाखाचे उत्पन्न आंबा विक्रीतून मिळवले आहे. साधारण दिवसाला १६० पेटी (१ ते ४ डझनच्या) आंबा विक्री झाल्याची माहिती हातखंबा येथील स्टॉल मालक मनोज नाचणकर यांनी दिली. भविष्यात या कृषी परिषदेमध्ये कोकणातील आंब्याला जास्त महत्त्व देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अशा परिषदेचा विशेष फायदा कसा करून घेता येतो ते हातखंबा येथील आंबा बागायतदार नाचणकर यांनी दाखवून दिले. त्यानी आंब्याचे २ स्टॉल लावले होते. सेंद्रीय आबा असा आपला ब्रॅण्ड तयार केला होता. दीडशे रुपयापासून ते अगदी चारशे रुपये डझन या प्रमाणे त्यांनी आंब्याची विक्री केली. त्यांच्या या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.www.konkantoday.com