
कोरोना रुग्णांच्या सेवेतील अधिकृत खासगी डॉक्टरांनाच पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत वीमा संरक्षण
केवळ राज्य किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोरोना रुग्णांच्या सेवेतील अधिकृत खासगी डॉक्टरांनाच पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपयांचे वीमा संरक्षण मिळू शकतं, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला आहे. नवी मुंबईत काम करणारे आयुर्वैदीक डॉक्टर भास्कर सुरगडे यांच्या विधवा पत्नीनं पंतप्रधान वीमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हायकोर्टात दाखल याचिका न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. डॉ. सुरगडे कोविड19 साठीचे नोंदणीकृत डॉक्टर नाहीत, त्यामुळे त्यांना या योजनेत वीमा संरक्षण मिळू शकत नाही, असा सरकारी वकीलांचा दावा हायकोर्टानं स्वीकारला
www.konkantoday.com