राज ठाकरेंनी एकत्र आल्यावर अनैतिक संबंध ठेऊ नये.; संजय राऊतांचा मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवरुन चढला पारा


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेसह इतर पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्यामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांना मुक्त विद्यापीठ म्हणाले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. राऊत म्हणाले की, “महापालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. महापालिकेत सध्या प्रशासक आहे, पण रस्त्यांवर पाणी साचत आहे, गटारी बघा. सरकारने राज्यात फक्त भ्रष्टाचार केला. सरकारला विनंती आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काम करावे. आता सैतानाच्या हातात राज्य आहे. मनपाला नगरसेवक देऊ शकत नाहीत. त्यांनी निवडणुका जाहीर करावी आमची तयारी आहे. त्यांची evm ची तयारी झाली नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना त्यांनी उदय सामंत यांची भेट घेतली आहे. उदय सामंत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. मात्र यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरेंवर प्रहार केला. ते म्हणाले की, “राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. तिथं जाऊन कोणाही पदवी घेऊ शकते. राज ठाकरे यांनी एक प्रस्ताव माडंला उद्धव ठाकरेंसमोर. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, देत राहू. फक्त आमची एकच अट आहे, ज्यांनी महाराष्ट्रासंदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, त्यांच्याशी उद्या आपण एकत्र आल्यावर अनैतिक संबंध ठेऊ नये,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button