
रत्नागिरी जिल्ह्यात व कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची उपस्थिती.
मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईस्थित कोकणवासीय चाकरमानी गावी दाखल होते आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जाणार्या रस्त्यांवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी आहे. जिल्ह्यातील समुद्रि्कनारे देखील पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. मुंबईहून येणार्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल पावत असून खेड, चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानके, बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे. मुंबईहून गावी येणार्या तसेच परतीच्या प्रवासाले रेल्वेचे तिकीट बुकिंगही महिनाधर आधीच फुल्ल झाले आहे. व्यामुळे बहुसख्य प्रवाशाना तत्काळ तिकिटासाठी धावाधाव करावी लागत आहे, कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने बरेच जण डेटिंग तिकिटावर प्रवास करण्यात धन्यता मानत आहेत.www.konkantoday.com