
देवरूख न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांचे चित्र आंतरराष्ट्रीय मासिकात.
इन आर्ट वर्ल्ड इंटरनॅशनल मॅगेझिन स्पर्धेत देवरूख न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांच्या चित्राची निवड झाली आहे. मांडवकर यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर येथील घाट परिसर कॅनव्हासवर रेखाटला आहे. हे चित्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकाचे मुखपृष्ठ बनणार आहे.या स्पर्धेत हजारो चित्रांमधून फक्त चार चित्रकारांची चित्रे निवडली गेली. यामध्ये मांडवकर यांच्या चित्राचा समावेश झाला आहे. या स्पर्धेत मांडवकर यांच्यासह अनुप सिन्हा, राजश्री नंदी, आर पद्मजा या चित्रकारांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, शिक्षकांनी अभिनंदन केले. मांडवकर याने आजपर्यंत अनेक जिल्हा, राज्यस्तरीय प्रदर्शनात आपली कला प्रदर्शित केली आहे.www.konkantoday.com