
तयार गव्हाच्या पिठ पॅकिंग पिशवीमध्ये मिळाल्या आळ्या, रत्नागिरीतील प्रकार.
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे राहणारे आनंद पेडणेकर यांच्या कुटुंबियांनी आज उद्यमनगर भागातील किरणामाल दुकानातून महालक्ष्मी किचन वंडर शुद्ध सात्विक पीठाची पिशवी विकत घेतली. मात्र त्यामध्ये चक्क आळ्या आढळून आल्या. या पॅकींगवर पीठ उत्पादनाची तारीख २६.०३.२०२५ अशी होती. तसेच यावरील एफएसएसएआय हा नंबर खोडलेला होता. पिठाच्या उत्पादीत तारखेपासून या पिठाला सहा महिने वापरण्याची मुदत असल्याचे पिशवीवर छापण्यात आले होते. पिठात आळ्या आढळल्याने पेडणेकर यांच्या कुटुंबियाने संबंधित दुकानाकडे धाव घेतली व त्यांना सदरचा प्रकार दाखवला.
दुकानदाराने याबाबत आपण वितरकांकडे व कंपनीकडे आपली तक्रार सांगू असे सांगून त्यांना बदलून दुसरा माल देण्यात आला. महालक्ष्मी फूड प्रॉडक्टस कोकणात दर्जेदार असे खाद्यपदार्थ प्रॉडक्स बनवत असून त्यांच्या या पिठामध्ये हा प्रकार आढळल्याने नेमकी त्रूटी कोणाच्यात आहे. सदरचा माल मुदत संपल्यानंतर विकला जात होता का? की अन्य कोणत्या कारणामुळे असा प्रकार घडला आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आनंद पेडणेकर व त्यांच्या कुटुंबियांनी केली असून याबाबत त्यांनी सदर घटनेचे फोटो व व्हिडिओ काढून ठेवले आहेत.www.konkantoday.com




