गुरव ज्ञाती समाज शाखा रत्नागिरीच्या वतीने १८ मे रोजी करिअर मार्गदर्शन शिबिर

रत्नागिरी : येथील गुरव ज्ञाती समाज (भाविक गुरव समाजाची प्रतिनिधिक संस्था) शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने रविवारी (१८ मे) दुपारी २ ते ५ यावेळेत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, रेल्वेस्टेशन नाका, रत्नागिरी येथे होईल. या शिबिरात नवनिर्माण महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी विभागप्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल, सिमेंस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक चीफ मॅनेजर आणि हेड ऑफ सर्व्हिस एशिया विश्वास गुरव आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन सिस्टीम, गर्ल्स आयटीआय, रत्नागिरीच्या शिल्प निर्देशक सौ. श्रुती मंगेश वेतोस्कर, नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रा. श्री. सुधाकर ज. मुरकुटे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी १५ मेपर्यंत सचिन गुरव (८९७५७६६६१०), ऋषिकेश गुरव(८८३०८०२९३२), महेंद्र गुरव (८२०८६५४८५४), विजय गुरव (९०४९५९०६१८) यांच्याकडे फोनद्वारे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरव ज्ञाती समाज शाखा रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button