
कोरोना चाचणीच्या दीर्घकाळ प्रलंबित अहवालांमुळे सिंधुदुर्ग जिल्हयात चिंता वाढली
कोरोना चाचणीच्या दीर्घकाळ प्रलंबित अहवालांमुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एकीकडे चाकरमान्यांचा ओघ वाढत असताना स्वॅब अहवाल फार धिम्या गतीने मिळत आहेत. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात केवळ २० अहवाल मिळाले. त्यातील तब्बल नऊ पॉझिटिव्ह होते. सध्या २८४ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात दिवसाला ६०नमुने तपासणी होईल, असे कोल्हापूर येथील लॅबकडून या आधी सांगितले असताना तीन दिवसांत अवघे २०अहवाल मिळाले आहेत. त्याबाबतच येथे चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
www.konkantoday.com