समोरील वाहनाला अपघात झाला म्हणून थांबलेल्या तरुण- तरुणीवर मृत्यूचा घाला, अपघात झाला म्हणून बघण्यासाठी थांबलेल्या तरुण-तरुणीला डंपरने चिरडले सिंधुदुर्गात भीषण अपघात


कोणाची कधी वाईट वेळ येईल हे सांगता येत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर असाच प्रकार घडला आहे समोरच्या गाडीला अपघात झाला म्हणून अपघात बघण्यासाठी थांबलेल्या तरुण-तरुणीला
मागून येणाऱ्या डंपरने धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महमार्गावर वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनुष्का माळवे राहणार अणाव आणि विनायक निळेकर राहणार रानबांबुळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनुष्का आणि विनायक हे दोघेही मुंबई- गोवा महामार्गावरून बाईकने प्रवास करत होते. त्याच वेळी त्यांच्यासमोर कारला अपघात झाला. कारला अपघात झाल्यामुळे दोघेही थांबले.

बाईक बाजूला लावून अनुष्का आणि विनायक हा कार अपघात पाहत होते. त्याचवेळी भयंकर घडलं. मागून येणाऱ्या डंपरने दोघांनाही जोरदार धडक दिली. या धडकेत अनुष्का आणि विनायक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ओरोसकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा कारने लाईटच्या खांबाला धडक दिली या कारमधून प्रवास करणारे १० जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

अनुष्का आणि विनायक हे दोघेही याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते

धुदुर्गमध्ये भीषण अपघातामध्ये तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डंपरने या दोघांना चिरडलं. हा अपघात मुंबई- गोवा महामार्गावर हुमरमळा येथे झाला. डंपर ओरोसवरून कुडाळच्या दिशेने जात होता.डंपरने धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महमार्गावर वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनुष्का माळवे राहणार अणाव आणि विनायक निळेकर राहणार रानबांबुळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनुष्का आणि विनायक हे दोघेही मुंबई- गोवा महामार्गावरून बाईकने प्रवास करत होते. त्याच वेळी त्यांच्यासमोर कारला अपघात झाला. कारला अपघात झाल्यामुळे दोघेही थांबले.

बाईक बाजूला लावून अनुष्का आणि विनायक हा कार अपघात पाहत होते. त्याचवेळी भयंकर घडलं. मागून येणाऱ्या डंपरने दोघांनाही जोरदार धडक दिली. या धडकेत अनुष्का आणि विनायक यांचा जागीच मृत्यू झाला. ओरोसकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा कारने लाईटच्या खांबाला धडक दिली या कारमधून प्रवास करणारे १० जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अनुष्का आणि विनायक हे दोघेही याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button