शासनाच्या सदनिका खरेदी सवलतीचा १६६५७ महिलांनी घेतला लाभ.

महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास राज्यसरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्का सवलत दिली जाते. त्यांना नेहमीच्या मुद्रांक शुल्कापेक्षा १ टक्के कमी शुल्क भरावे लागते. गेल्या चार महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील ५७ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्या नावावर घरखरेदी झाली आहे. त्यामुळे या महिला त्या घराच्या मालकीण झाल्या आहेत.महिलांचा योग्य सन्मान राखण्यासाठी त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय २१ मार्च २०२१ रोजी घेतला होता. रत्नागिरी शहरात आता घरे बांधण्यासाठी जागा शिल्लक नाहीत. त्यामुळे रत्नागिरीच्या बाहेर असलेल्या जागांनाही आता मागणी वाढली आहे.सध्या रत्नागिरी शहरात फ्लॅट मिळणे अवघड झाले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ३ हजार दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. मालमत्तांची खरेदी महिलांच्या नावे फारच कमी होते. वडिलोपार्जित मालमत्तांमध्येही त्यांना हिस्सा कमी मिळतो. महिलांचा योग्य सन्मान करण्यासाठी तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने त्यांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button