मुंबईत तातडीची बैठक, राज्य सरकार-संरक्षण दलात अत्यंत महत्वाची चर्चा,


भारत आणि पाकिस्तानमधीलयुद्धजन्य परिस्थिती चिघळल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्याची घोषणा केली. तरीही संपूर्णपणे तणाव अद्याप निवळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध महत्त्वाच्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय लष्कराकडून लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा आणि कर्नल संदीप सील, नौदलाकडून रिअर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी आणि कमांडर नितेश गर्ग, तर वायुदलाकडून एअर वाइस मार्शल रजत मोहन उपस्थित होते. याशिवाय आरबीआय, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड आदी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झालेया बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग, सायबर सुरक्षा आणि खबरदारीचे उपाय यासंबंधीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारकडून संरक्षण दलांना आवश्यक सहकार्य आणि जलदगतीने समन्वय यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यातआला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ऑपरेशन सिंदुरचा विशेष उल्लेख करत भारतीय लष्कराचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय सैन्याने ज्या अचूकतेने ऑपरेशन सिंदुर पार पाडले, ते कौतुकास्पद आहे. मी त्यांना सलाम करतो. मुंबई ही देशाची राजधानी आहे. तिची सुरक्षा ही प्राधान्याची बाब आहे. यापूर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शत्रूंनी भारताच्या आर्थिक शक्तीवरच आघात करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भविष्यात अधिक सजग आणि एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे.” असं मुख्यमंत्री म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button