
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे १५ मे रोजी लांजा येथे मेळावा.
रत्नागिरी, दि. 13 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे १५ मे २०२५ रोजी प्रा. मधु दंडवते सभागृह, लांजा येथे माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /विर नारी / वीर माता/ वीर पिता यांचा मेळावा आयोजित केला आहे.* या मेळाव्यात पेन्शन विषयक, अभिलेख कार्यालय विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्या सोबत डीस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ. ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. मेळाव्यास माजी, सैनिक / माजी सैनिक विधवा /वीर नारी / वीर माता/वीर पिता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.