
टिके व चांदेराई मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरा..भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांची मागणी..
रत्नागिरी हरचेरी देवधे राज्य महामार्ग क्रमांक 165 वर टिके शिंदे वाडी व चांदेराई धरणासमोर रस्त्याला मोठे खड्डे पडले असल्याने वाहन धारकांना वाहने चालवणे खूप त्रासाचे झाले आहे..अनेक वेळेला टू व्हीलर वाहन धारक या ठिकाणी पडले आहेत. वाहन धारकाला वाहन चालवणे अवघड तर झाले आहेच पण पादचारी यांना या रस्त्या वरून चालणे कठीण झाले आहे..अनेक शाळेच्या विध्यार्थ्यांना देखील त्रास होत आहे..याबाबत आज भारतीय जनता पार्टी दक्षिण अध्यक्ष दादा दळी व भारतीय जनता पार्टी उत्तर चे अध्यक्ष विवेक सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात भेट देऊन कार्यकारी अभियंता ओठवणेकर साहेब यांना भेटून सविस्तर परिस्थिती कथन केली . यावेळी ओठवणेकर साहेब यांनी उपविभाग क्रमांक 4 चे शाखा अभियंता कांबळे रावसाहेब यांना बोलावून सदरचे खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश दिले..दादा दळी व विवेक सुर्वे यांनी ओठवणेकर साहेबांच्या तात्काळ घेतलेल्या कृतिबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले.




