
रत्नागिरी शहरातील माळनाका येथे एका दुकानाच्या सुमोरील फुटपाथवर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली
रत्नागिरी शहरातील माळनाका येथे एका दुकानाच्या सुमोरील फुटपाथवर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या सुमारास माळनाका येथील सावरीया भेळ सेंटर दुकानाच्या समोरील फुटपाथवर घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश गमेरलाल गायरी (वय ३९, रा. पल्लीनाथ रोड, पाली बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी त्यांच्या भावाची दुचाकी (क्र. एमएच-०८ एए ०२८८) ही माळनाका सावरीया भेळ सेंटर समोरील फुटपाथवर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली.




