
रत्नागिरी-देवरुख मार्गावर पांगरी येथे टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक.
रत्नागिरी-देवरुख मार्गावर पांगरी पोस्ट ऑफिस एस.टी. स्टॉपजवळ शनिवारी टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश जयराम रांबाडे (वय ३५, रा. हातखंबा मेडेश्वर नगर) हा त्याच्या ताब्यातील टाटा ७०९ टेम्पो (एम.एच. ०८/डब्ल्यु-४१६९) मध्ये खडी भरून हातखंब्याहून वायंगणेच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पांगरी पोस्ट ऑफिसजवळ वळणावर त्याने रस्त्याची परिस्थिती न पाहता निष्काळजीपणे टेम्पो चालवला. त्यामुळे समोरून देवरुखच्या दिशेने येणाऱ्या कार ( एम.एच.१२/एल.व्ही.-३४७१) ला त्याची धडक बसली.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.