
सलग दोन दिवस झालेल्या जोरदार वार्यामुळे आरे सुरूबनाची मोठी पडझड.
सलग दोन दिवस मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार वार्यामुळे काजिरभाटीनजिकच्या आरे सुरूबनाची मोठी पडझड झाली आहे. बुधवारी पहाटे सोसाट्याच्या वार्यामुळे आरे समुद्रकिनार्याच्या सुरूबनातील पन्नासपेक्षा जास्त झाडे मोडून पडली. तर गुरूवारी पहाटे रस्त्यावर सुरूची झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी सकाळी घटनास्थळी जावून रस्त्यावरील झाडांची कटाई करत मार्ग वाहतुकीस मोकळा करून दिला.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटे जोराचा वारा झाला. या वार्यामुळे आरे सुरूबनातील काही झाडे मुळासकट उन्मळून पडली तर काही झाडे मधोमध मोडून पडली.www.konkantoday.com