
शासकीय रूग्णालयाच्या नव्याने सुसज्ज केलेल्या पोलीस चौकीला कुलूप
रूग्ण अपघातग्रस्तांना तातडीची मदत जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व पोलीस यांच्याकडून मिळते. येथील जिल्हा रूग्णालयात रूग्णांना वैद्यकीय अधिकारी मिळतात पण रूग्णालयातील पोलीस चौकी शोधूनही सापडत नाही. जिल्हाभरामधून येणार्या नागरिकांना व रूग्णांना त्याचा फटका सहन करावा लागत असून संतापही व्यक्त करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या दर्शनी भागात नव्याने सुसज्ज केलेल्या पोलीस चौकीला कुलूप ठोकण्यात आले आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारातील पोलीस चौकी सध्या अदृश्य आहे. गतवर्षी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीजवळ पोलीस चौकी होती. इमारतीच्या नूतनीकरणासाठी रूग्णालयाची पोलीस चौकी अपघात विभागात हलवण्यात आली. तिची अवस्था एखाद्या अडगळीत तात्पुरत्या निवासगृहासारखी झाली आहे. ना नावाचा फलक, ना पाण्याची व फोनची सोय. पोलीस कर्मचारी चौकीत नित्यनियमाने येतात. आपले काम करतात आणि निघून जातात. याकडे प्रभारी शहर पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष झाले असून, त्याचा फटका थेट नागरिक आणि रूग्णांना सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com