
वैध नकाशा जोडल्याशिवाय होणार नाही दस्तनोंदणी.
जमीन खरेदी-विक्री व्यवहार अधिक तर्कसंगत होण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. जिरायत बागायत जमीन खरेदी, विक्रीसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले असून आता दस्त नोंदणीला जमीन मोजणी नकाशा जोडल्याशिवाय दस्त नोंदणी होणार नसल्याचे आदेश जारी झाले आहेत.शासनाने जमीन मोजणीसाठी अत्याधुनिक बदल केले आहेत. १९६१ पासूनचे जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड ऑनलाईन केले आहे. जमीन मोजणी करायची झाल्यास मिळकतधारकांना आता अधिक सोयीचे झाले आहे. शासनाने जमीन विक्री-खरेदी करायची झाल्यास आता शेतकर्याला सुरूवातीला जमीन मोजणी करून हद्द व चतुःसीमा निश्चित करावी लागणार आहे.www.konkantoday.com