
गावखडी, मालगुंड किनारी नवीन हॅचरी**समुद्री कासव संवर्धन
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, मालगुंड आणि भाट्ये समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात समुद्र कासवांची घरटी आढळुन आली आहेत. त्याच्या संरक्षणासाठी वन विभाग, कांदळवन कक्ष आणि कासवमित्र करत असून घरट्यांसाठी हॅचरी बांधली आहे. भाट्येत सापडलेली १४९ अंडी संरक्षणासाठी गावखडी येथील हॅचरीमध्ये नेऊन ठेवली आहेत. रत्नागिरी वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर समुद्री कासवांचे संवर्धनाचे काम मौजे गावखडी व मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर केले आहे. कासवांची अंडी हॅचरीमध्ये संवर्धन करुन त्यामधून निघणारी पिल्ले समुद्रात सोडण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. गेल्या महिन्यात १० तारखेला वरवडे रिळ येथे कासव घरटे मिळाल्याची माहिती मिळाली. त्याची खात्री केली असता ४ घरटी आढळून आली. या घरट्यांचे जाळी मारुन संवर्धन करण्यात आले आहे. तसेच २३ फेब्रुवारीला भाट्ये समुद्र किनारी कासवाचे घरटे आढळुन आले. या घरट्यातील १४९ कासवाची अंडी संरक्षणासाठी गावखडी येथील हॅचरीमध्ये नेऊन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. २१ फेब्रुवारीला पुन्हा एक भाटे कासव घरटे आढळूण आले. गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन भाटे समुद्रकिनारी नव्याने हॅचरीची निर्मिती करुन १०८ अंडी सुरक्षित आणि संवर्धित केली आहे. या ठिकाणी कासव मित्र म्हणून समीर भाटकर यांची नेमणूक केलेली आहे. www.konkantoday.com