
प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकून गेल्या तीन महिन्यात एसटी आगाराला १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न.
आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून एसटीच्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाखांची भर पडत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये रत्नागिरी एसटी आगाराला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे, परंतु अनेक वर्षापासून एसटी महामंडळाचे चाक आर्थिक खोलात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकत्न महामंडळाने केले परंतु त्यांना फारसे यश आले नाही. त्यापैकी कार्गो सेवेने काहीसे एसटीला तारले, परंतु डिझेल, चेसिस, टायर या घटकांच्या किंमती वाढल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ केली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. प्रवाशांमधून संताप व्यक्त झाला. काही संघटना, पक्षांनी भाडेवाढ मागे घ्यावी यासाठी आंदोलनही केली होती.www.konkantoday.com