
चिपळूण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथे झालेल्या अपघातात पाच जण जखमी.
चिपळूण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नायशी फाटा येथे बुधवारी दुपारी अडीच वाजता झालेल्या मोटार अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पो चालकांविरूद्ध सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.किसान शिवराम पालकर (तळघर, पोफळवणे खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रवीण बाबासो इंगळे (३२, बदलापूर पूर्व) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात दिली. तर या अपघातात प्रवीण बाबासाहेब इंगळे (३२), ईश्वर नागा पुजारी, जालाजा ईश्वर पुजारी, रोशनी ईश्वर पुजारी (सर्व रा. बदलापूर ठाणे) तसेच किसान शिवराम पालकर (खेड) हे पाचही जण जखमी झाले आहेत. यातील फिर्यादी प्रवीण इंगळे हे टाटा कंपनीची टिगोर गाडी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने रत्नागिरीकडे घेऊन जात असताना किसान पालकर याने सुझुकी कंपनीच्या कॅरी टेम्पोने रस्त्याच्या विरूध्द दिशेने येत समोरासमोर धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com