
कोकण मार्गावर पावसाळ्यात वंदे भारतच्या ६ फेर्या चालवा, कोकण विकास समितीची मागणी.
कोकण मार्गावरून धावणार्या सुपरफास्ट सीएसएमटी-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशाची सर्वाधिक पसंती मिळत आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवसांऐवजी तीन दिवस चालवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांचा उदंड प्रतिसाद पाहता पावसाळ्यातही वंदे भारतच्या नियमितपणे ६ फेर्या चालवाव्यात अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.
जनशताब्दी एक्सप्रेसलाही अतिरिक्त डबा जोडण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.कोकण मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावू लागल्यापासून काही फेर्यांचा अपवाद वगळता आठवड्यातून सहाही दिवस नियमितपणे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी संख्येने धावत आहे. कोकण रेल्वेच्या कामकाजाच्या अडथळ्यांमुळे पावसाळ्यात मान्सून वेळापत्रकानुसार वंदे भारत ६ दिवसांऐवजी फक्त ३ दिवस चालवण्याची विनंती करण्यात आली आहे.www.konkantoday.com