करोडो रुपये खर्चुन शिव नदीतील काढलेला गाळ पुन्हा नदीत.

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी करोडों रूपये खर्च कस्त वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. मात्र शिव नदीत काढण्यात येणारा गाळ पुन्हा नदीपात्रातच डम्प करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या युवा सेनेचे शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी हा गंभीर प्रकार निदर्शनास आणून देताच विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व शिवसैनिकांनी गुरूवारी कापसाळ येथील पाटबंधारे विभागावर धडक दिली. गाळ उपशात ’फसवेगिरी’ सुरू असून  मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले. शिव नदीत सुरू झालेल्या गाळ उपशाचे काम गेले आठ दिवस अशाच प्रकार सुरू आहे. अधिकार्‍यांना दिसत नाही का, जनतेच्या जिवाशी खेळ केला जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जातेय, असा संतप्त सवाल करण्यात आला. दरम्यान, संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी कामावर देखरेख करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाईची जोरदार मागणी करून डम्प केलेला गाळ तातडीने नदीपात्राबाहेर काढा अशा सूचना केल्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button