आम्ही पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने’; भारत-पाक तणावादरम्यान चीनचं मोठं विधान


भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने एक नवीन विधान केले आहे. चीनने म्हटले आहे की आम्ही पूर्णपणे पाकिस्तानसोबत आहोत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश पाकिस्तानचे “सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य” राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील.परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना हे विधान केले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चर्चेदरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना उदयोन्मुख प्रादेशिक परिस्थितीची माहिती दिली. आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानच्या संयम आणि जबाबदार वृत्तीचे वांग यी यांनी कौतुक केले. परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानचा धोरणात्मक सहकारी भागीदार आणि कट्टर मित्र म्हणून चीन पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी खंबीरपणे उभा राहील, याची त्यांनी पुष्टी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button