
आता काळबादेवी ग्रामस्थांचा फ्लायओव्हरला विरोध, ग्रामपंचायतीच्या ठरावाप्रमाणे महामार्ग करण्याची मागणी
. सागरी महामार्गावरील मिर्या-काळबादेवी पूल आणि त्यापुढील महामार्ग या संदर्भात घेतलेल्या काळबादेवी येथील विशेष ग्रामसभेत फ्लायओव्हर ब्रीजला विरोध करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२४ ला झालेल्या ग्रामसभेने केलेल्या ठरावाप्रमाणे महामार्ग करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने दिलेला फ्लायओव्हरचा प्रस्ताव ग्रामस्थांना मान्य नाही. गावाबाहेरील काही उद्योजकांची मदत करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा संशय सरपंच पृथ्वीराज मयेकर यांनी व्यक्त केला आहे. काळबादेवी ग्रामपंचायतीत ७ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत एमएसआरडीसीने दिलेल्या नवीन प्रस्तावानुसार जो सर्व्हे सुरू केला आहे तो आम्हाला मंजूर नाही. ५ सप्टेंबर २०२४ ला ग्रामसभेने जो ठराव मंजूर केला होता त्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.www.konkantoday.com




