
मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या रत्नागिरीत निघणार तिरंगा रॅली.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिक व देशाला खंबीर पाठीशी असल्याचे सांगत मनोबल वाढविण्यासाठी उद्या रत्नागिरीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, नागरिक व सर्व स्तरातील कर्मचार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.