
केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात ३५ टक्क्यांनी वाढ.
केंद्र शासनाच्या १९७० च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ६५२.६० इतकी होती. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयान नवे निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मोजणीत त्यामध्ये २२५.३७ कि.मी. एवढी वाढ होवून महाराष्ट्राची किनारपट्टी आता ८७७.९८ किमी. इतकी झाली आहे. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार ही वाढ जवळपास ३४.५४ टक्के असल्याचे दिसून आले आहे.
बंदर उभारणीसह विविध विकासकामे व किनारा मापनाच्या बदललेल्या पद्धतीमुळे किनारपट्टी क्षेत्रात वाढ झाली आहे.१९७० मध्ये ७,५१६.६० किलोमीटर एवढी होती. नव्या सर्वेक्षणानुसार २०२३-२४ मध्ये ही लांबी ११,०९८.८१ कि.मी.वर पोहोचली आहे.www.konkantoday.com