
सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी योग्य भूमिका घेतलेली आहे- उदय सामंत
राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक चर्चा झालेली आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी योग्य भूमिका घेतलेली आहे, किती जागा पाहिजेत हे देखील सांगितले आहे. त्याबाबत भाजपाचे केंद्रीय नेते अमित शहा, जे.पी.नड्डा हे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही शिवसेना समर्थन करणार असून त्यावर सकारात्मक निर्णय होउन राज्य सरकार स्थापन होणार असल्याचे शिवसेना नेते तथा आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.