खेडमधील सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्यासाठी वैभव खेडेकर यांनी दिले निवेदन.

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँकेमध्ये, आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलेच पाहिजेत, बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत, यासाठी शांततापूर्वक निवेदन देण्यात आले. तसेच लाकडी दांडाही भेट देण्यात आला. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार अन्य भाषा चालणार नाही, असे ठणकावून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे, असे सक्त आदेश काढले आहेत; मात्र तरीही महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्येदेखील मराठीचा वापर होताना दिसत नाही. याच अनुषंगाने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँक (आस्थापनांमध्ये) कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलेच पाहिजेत, बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी शांततापूर्वक निवेदन देण्यात आले. तसेच लाकडी दांडाही भेट देण्यात आला.

आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठीचा वापर झालाच पाहिजे. तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येकाशी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मराठी भाषेत योग्य पद्धतीने संवाद साधावा आणि जे अमराठी अधिकारी, कर्मचारी आहेत त्यांनी लवकरात लवकर मराठी भाषा आत्मसात करावी, अशी आग्रही मागणी श्री. खेडेकर यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button