
स्टेटसवर पाकिस्तान प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरानी दाखवला इंगा रत्नागिरीतही घडले ‘ऑपरेशन देशप्रेम’.
रत्नागिरी :एकीकडे भारत सीमेपलीकडील दहशतवाद आणि त्याला खतपणी घालणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवत असताना या रत्नागिरीत पाकिस्तानचे गुणगान गाणारे जिहादी मानसिकतेची माणसे राहत असल्याचे समोर आले आहे. या पाकिस्तानचा जिंदाबाद करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोशल मीडियावर निंदा करणाऱ्या तरुणाला देशप्रेमी रत्नगिरीकरांनी चांगलाच चोप अद्दल घडवली आहे.पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६ आणि ७ मे च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करत दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उध्वस्त केली.
एकीकडे भारत या जल्लोषात असताना रत्नागिरीतील एका आस्थापनेवर काम करणाऱ्या एका जिहादी मानसिकतेच्या मुस्लीम युवकाने उघडपणे ‘पाकिस्तान जिंदाबाद…मोदी किलर आहे…मोदी मुळे हे घडत आहे….पाकिस्तान साठी प्रार्थना करा…..’ असे स्टेट्स त्याच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्स अँप ला लावले आणि व्हायरल केले होते. यामुळे खळबळ उडाली होती. सदर स्टेट्स काही देशप्रेमी रत्नागिरीकरांच्या निदर्शनास आली, त्या युवकाची माहिती काढल्यानंतर तो रत्नागिरीतील एका प्रसिद्ध आस्थापनेत काम करत असल्याचे माहिती मिळाली.
रत्नागिरीकर तरुणांनी ते शोरूम गाठले असत त्या व्यवस्थापनाने युवकाला या स्टेटसमुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यातआले.मात्र भारतात राहूनही दहशतवाद्यांवर प्रेम उतू जाणाऱ्या आणि पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या या युवकाला देशप्रेम शिकवण्याचा निश्चय केलेल्या रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी त्या मुस्लिम तरुणाला आज शोधून गाठलेच आणि आपल्या पद्धतीने यथेच्छ चोप देत भारत माता की जय म्हणायला लावले. भारताच्या पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानं चे जिंदाबाद असे स्टेट्स ठेवणाऱ्या या युवकाला भारताची ताकद रत्नागिरीमधील देशप्रेमींनी दाखवली आहे.