रत्नागिरी रेल्व स्थानकावरील प्लॅटफॉर्म व अन्य सुविधांचा कायपालट होणार, आ. किरण सामंत यांनी केली पाहणी.

रत्नागिरी एमआयडीसीच्या माध्यमातून कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्व स्थानकावरील प्लॅटफॉर्म व अन्य सुविधांचा कायपालट केला जात असून, या सर्व कामांची लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांच्या प्रगतीबाबत ठेकेदार आणि कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या. तब्बल ३० कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार असून, आ. सामंत यांनी सुचवलेल्या अतिरिक्त कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. आ. किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सोमवारी दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जाऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संपूर्ण रत्नागिरी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. राज्याच्या बांधकाम विभागाकडून रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या बाह्य भागाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

आकर्षक असे रेल्वे स्थानक दिसत आहे. यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म व अन्य कामांसाठी सुमारे ३० कोटीचा निधी एमआयडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पत्र्यांचे अच्छादन केले जाणार आहे. नवीन लिफ्टसह अन्य विविध कामे केली जाणार असून, विमानतळाप्रमाणे आकर्षक असे रेल्वे प्लॅटफॉर्म असणार आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांना सामान घेऊन कसरत करीत स्थानकावर यावे लागते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी सूचना केल्या. यावेळी ठेकेदार कंपनी ज्ञातीच्या अधिकार्‍यांसह रेल्वेचे रत्नागिरी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button