
यंदाच्या पावसाळ्यात अणुस्कूरा घाट वाहतुकीसाठी निर्धोकठेवा -प्रांताधिकार्यांच्या सूचना
राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जिल्ह्यातील सर्वात नजिकचा मार्ग म्हणजे अणुस्कूरा घाटात पावसाळी हंगामात गेली तीन चार वर्षे पावसाळ्यात दरडी व माती कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणारी उपाययोजना तात्पुरती स्वरूपाची असते. त्यामुळे धोकादायक दरडी, अरूंद आणि धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठडयांची आवश्यकता आदिंच्या अनुषंगाने सर्वेक्षण करून अणुस्कूरा घाट रस्ता निर्धोक होण्यासाठी यंदा खबरदारीच्या उपाययोजनांचा तत्काळ आरखडा तयार करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. नागमोडया वळणांच्या या घाटरस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंच डोंगर, उभ्या रेषेतील दरडी, मोठमोठया दगडी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. गेल्या दोन तीन वर्षामध्ये अतीवृष्टीच्या काळामध्ये या मार्गावर दगड आणि माती पडून रस्ता काही काळापूरता बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मात्र वर्षभरात या घाटातील धोकादायक स्थितीमध्ये अद्यापही बदल करण्यात आलेले नाहीत. गतवर्षी पावासाळ्यात तर सातत्याने दरडी कोसळणे, भूस्खलन होणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी नैसर्गिक आपत्ती आराखडा आढावा बैठकीमध्ये गंभीर दखल घेतली आहे. सुमारे ९ कि.मि. असलेल्या तालुक्यातील अणुस्कूरा घाटमार्गाने कमी कालावधीमध्ये ये-जा करणे शक्य असल्याने अनेक वाहनचालकांकडून घाटमाथा ते कोकण अशा प्रवासाला या पसंती दिली जाते. त्यामुळे या घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.www.konkantoday.com