भाजपचे (दक्षिण) जिल्हाध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडणार हे १० मे रोजी ठरणार, पाच नावे आघाडीवर.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाकडे लक्ष केंद्रीत केलेल्या महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपाने सदस्य नोंदणी कार्यक्रमासह पक्षीय पातळीवर नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी भाजप (दक्षिण) नवा जिल्हाध्यक्षपदाचा शिलेदार येत्या १० मे रोजी जाहीर होणार आहे. या पदाच्या शर्यतीत असलेल्या विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह चौघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.राज्यात मागील विधानसभेनंतर सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. त्यामुळे राज्यभरात भाजपने पक्षीय पातळीवर भाकरी फिरवण्याच्या निर्णय घेतला आहे. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १०२१ मंडळांपैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. यानंतर आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांकडे भाजपने लक्ष केंद्रीत केलेले आहे.पक्ष सदस्य नोंदणी कार्यक्रमासह पक्षीय पातळीवर नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात १०२१ मंडळांपैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी उत्तरमध्ये ७व. दक्षिणमध्ये १२ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

आता भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षपद बदलाविषयी सार्‍यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यासाठी पाच नावे आघाडीवर आहे.भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची प्रक्रिया प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पक्ष पर्यवेक्षक आमदार संजय केळकर, निरीक्षक माजी आमदार प्रमोद जठार आणि संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत भाजपच्या २५ जणांच्या कमिटीते प्राधान्यक्रमाने ठरवण्यात आलेली नावे पाकिटात बंद केली आहेत. ती नावे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली आहेत.रत्नागिरीसह एकाचवेळी राज्यातील भाजपच्या ७८ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत. नव्या जिल्हाध्यक्षपदासाठी नेमलेल्या कमिटीने आपली मते बंद पाकीटामध्ये लिहून दिली आहेत भाजपच्या जिल्हा कार्यालयात गेल्या सोमवारी २८ एप्रिल रोजी सायंकाळी बंद पाकिटातून मते घेण्यात आली. यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतेज नलावडे, प्रमोद अधटराव, अमित केतकर, मुन्ना चवडे, यांची नावे नव्या जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची जोस्दार चर्चा आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button