
,खेड शहरातील कचराप्रश्न दिवसेंदिवस गंभीर, जगबुडी किनारी कचर्यात कोंडतोय ’श्वास’
खेड शहरातील कचराप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. जागेअभावी कचरा प्रकल्पाचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. सद्यस्थितीत समर्थनगर येथे जाळून कचर्याची विल्हेवाट लावली जात आहे. दिवसभर धुमसणार्या कचर्यात समर्थनगरच्या रहिवाशांचा ’श्वास’ कोंडत आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातून दिवसाकाठी जमा होणार्या होणार्या ८ टनाहून अधिक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर प्रशासनाकडे अजूनही हक्काची जागा नाही. एकीकडे नगर प्रशासन ’स्वच्छ खेड, सुंदर खेड’चा डांगोरा पिटत कचरामुक्त शहरासाठी झटत असली तरी जागेअभावी कचराप्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा प्रकल्पाच्या जागेसाठी जंग जग पछाडूनही अद्याप जागा पदराते पडलेली नाही. यामुळे कचर्याची विल्हेवाट लावायची तरी कुठे, असा प्रश्न नगरप्रशासनाला सतावत आहेत.www.konkantoday.com