
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू; लष्कराचे जवान घटनास्थळी.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता गंगोत्रीकडे जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवासी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.हेलिकॉप्टरमध्ये सुमारे सात प्रवासी होते आणि दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, लष्कराचे जवान, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी, एक टीम १०८ रुग्णवाहिका, भटवारीचे बीडीओ आणि महसूल पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानणीजवळ हेलिकॉप्टर अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. ‘हेलिकॉप्टर अपघातस्थळी प्रशासन आणि मदत पथके उपस्थित आहेत’, असे ते म्हणाले.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला. तसंच, या घटनेच्या चौकशीचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की ते अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि दाखल्याचे निरीक्षण करत आहेत.