
इतिहास अभ्यासक स्नेहल बने यांना रत्नदुर्ग किल्ल्यावर पुन्हा सापडले ’मंकला’ खेळाचे अवशेष.
रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला परिसरात पुन्हा एकदा नव्याने प्राचीन पटखेळ मंकलाचे अवशेष आढळून आले आहेत. इतिहास अभ्यासक स्नेहल सुभाष बने या मागील काही महिन्यांपासून रत्नदुर्ग किल्ला परिसराचा अभ्यास करत आहेत. यादरम्यान याआधी त्यांना या खेळाचे अवशेष दिसून आले होते. आता पुन्हा नव्याने प्राचीन बैठे म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंकलाचे अवशेष त्यांना दिसून आले आहेत. रत्नदुर्ग संशोधनात हा शोध महत्वाचा असल्याचे बने यांनी सांगितले आहे.रत्नदुर्ग किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत. पहिला महादरवाजा, दुसरा दीपगृह परिसर व तिसरा भगवती मंदिर, किल्ल्यावरील हनुमान मंदिराशेजारी या प्राचीन पटखेळाचे अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा २४ पटांचा संकला हा उभ्या रांगेत १२ पट आणि आडव्या रांगेत बारापट तसेच दुसर्या ठिकाणी १२ पटांचे आणखी दोन मंकला असे एकूण तीन मंकला पटखेळ १ मे रोजी आढळून आले.मंकला हा खेळ विशेषतः आफ्रिकेत खूप प्रचलित आहे. दक्षिण आफ्रिकेत हा खेळ ’बाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. जगभरात हा खेळ खेळला जात होता. या खेळाचे सुमारे ३५०० वर्षापूर्वीचे संदर्भ आणि अवशेष इजिप्तमध्ये लुकजर कारनक या वास्तूमध्ये या खेळाचे अवशेष पाहायला मिळतात. ’स्थालांतराने याचा प्रसार आफ्रिका पासून मध्य आशिया व दक्षिण आशियात झाला.www.konkantoday.com