
रायगडमध्ये विचित्र अपघात; टेम्पोची सायकल, पोलीसगाडी अन् दुचाकीला धडक, तिघांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. रायगडमधील मोर्बा-माणगाव मार्गावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सची सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला.अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दिनेश शेलार, विजया शेलार आणि वामन पवार सर्व राहणार माणगाव अशी मृतांची नावं आहेत.