प्रवाशांच्या सोयीसाठी आता आरक्षण कन्फर्मेशन २४ तास आधीच.

प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी सुधारणा करताना भारतीय रेल्वेने एक नवीन पुढाकार घेतला आहे. आतापासून रेल्वे आरक्षण चार्ट २४ तास आधी तयार केला जाणार आहे. याद्वारे प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही याची माहिती २४ तास आधी मिळेल. पूर्वी ही माहिती फक्त ४ तास आधी उपलब्ध होती. या बदलामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे चांगले नियोजन करण्यास मदत होईल. तसेच ते पर्यायी व्यवस्था देखील करू शकतील. ६ जूनपासून बिकानेर विभागात या नवीन प्रणालीची चाचणी सुरू झाली असून लवकरच ती देशात इतरत्रही होईल. ट्रेनने प्रवास करणार्‍यांसाठी रेल्वे मंत्रालय आता एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे. नव्या नियमामुळे प्रवाशांना टेनमध्ये सीट मिळवण्याबाबत होणारा त्रास कमी होईल. नवीन नियमानुसार रेल्वे ट्रेन सुरू होण्याच्या २४ तास आधी चार्ट जारी करण्याची योजना आखत आहे. साहजिकच प्रवाशांना २४ तास आधीच त्यांच्या सीटची स्थिती कळणार आहे. यामुळे दूरवरून येणाच्या प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म आहे की नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत कळत नव्हते. मात्र, आता ही माहिती एक दिवस अगोदरच समजणार असल्याने प्रवाशांची ’धाकधूक’ कमी होणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button