
चिपळुणातही अमली पदार्थविरोधात धडक कारवाई सुरू, दोघांवर गुन्हा दाखल.
जिल्ह्यातून अमली पदार्थाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने चिपळूण पोलिसांनीही कंबर कसली असून सोमवारी गोवळकोट रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणार्या दोन तरूणांवर कारवाई केली. यामुळे शहरासह तालुक्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अंमली पदार्थाच्या नशेमुळे सध्याची तरूणाई बरबाद होऊ लागली आहे. अमली पदार्थ सेवनामुळे त्यांची कुटुंब उध्वस्त होत आहेत. याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्ती सुध्दा वाढत असल्याचे भयानक चित्र निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ’अमली पदार्थमुक्त जिल्हा करण्यासाठी विशेष पाऊल उचलले आहे.www.konkantoday.com




