
कोकण रेल्वेत होताहेत वाढत्या चोर्या मात्र रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याला लागलय कुलूप.
कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर देण्यात आली. रोहा, रत्नागिरी, कणकवली येथे पोलीस स्थानके उभारून त्या माध्यमातून चोरीसह अन्य गुन्हे उघड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या त्या जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले जाणार होते. परंतु लोहमार्ग पोलीस दलात जाण्यासाठी स्थानिक पोलीस कर्मचारी इच्छुक नसल्याने कर्मचार्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली असून, तिनही रेल्वे स्थानकातील तात्पुरत्या पोलीस स्थानकांना कुलूप ठोकण्यात आले आहे. शासनाने या पोलीस स्थानकांचा शुभारंभ केला असला तरी प्रत्यक्षात पोलीस स्थानके केव्हा सुरू होणार? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.www.konkantoday.com