
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘इग्नाईट महाराष्ट्र’ बुधवारी कार्यशाळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणे आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागृता वाढविणेसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आयजीएनआयटीई महाराष्ट्रा या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन उद्या बुधवार दि. 31 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांनी दिली.
कार्यशाळेमध्ये डीजीएफटी, अपेडा, अमपेडा, मैत्री आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, बँक अधिकारी विविध एक्सपोर्ट प्रोमोशन कन्सुलचे प्रतिनिधी उपस्थित राहून उद्योजकांना केंद्र व राज्य शासनाच्या उद्योगांसाठीच्या योजना व कार्यक्रम याबाबत माहिती देणार आहेत. जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातीमध्ये स्वारस्य असणारे शेतकरी, तसेच वाणिज्य, अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.000




