
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगांव-एलटीटी स्पेशलला २५ मे पर्यंत मुदतवाढ.
उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगांव-एलटीटी स्पेशलला २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. यामुळे चाकरमान्यांना विशेषतः पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. ०११०४/०११०३ क्रमांकाची मडगांव-एलटीटी स्पेशल दर रविवारी ४ मे पर्यंत धावणार होती. तर परतीच्या प्रवासात दर सोमवारी ५ मेपर्यंत धावणार होती. ही स्पेशल ११ ते २५ मे तर परतीच्या प्रवासात १२ ते २६ मे या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. स्पेशलला देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याने प्रवासी सुखावले आहेत.
जबलपूर-कोईमतूरला ७ तासांचा लेटमार्क कोकण मार्गावरून धावणार्या जबलपूर-कोईमतूर एक्सप्रेसला रविवारी ७ तास २० मिनिटांचा लेटमार्क मिळाला. विकेंडलाच झालेल्या रखडपट्टीने प्रवाशांना घाम फुटला. दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एलटीटी-मडगांव एक्सप्रेस, सीएसएमटी-मंगळूर एक्सप्रेस, कोच्युवेली एक्सप्रेस, गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस, ओखा एक्सप्रेस, एलटीटी कोच्युवेली एक्सप्रेस, निजामुद्दीन-तिरूवअनंतपुरम एक्सप्रेस १ ते दीड तास उशिराने मार्गस्थ झाल्या.www.konkantoday.com