
चिपळूण शहरातील जुना बसस्थानकावर खासगी वाहनांचा कब्जा.
चिपळूण शहरातील जुना बसस्थानकावर खासगी वाहनांनी कब्जा मिळवला आहे. येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पार्किंग केले जात असल्याने गुहागर मार्गावरील प्रवासी घेण्यासाठी एसटी बसेस चक्क मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जात आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. तरीही आगार व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून बाजारपेठेत एसटी महामंडळाचे जुना बसस्थानक आहे.
काही वर्षे मागे जाता या स्थानकात गुहागर मार्गासह पोफळी मार्गावरील काही बसेस जाऊन येथे नोंदणी करून व प्रवाशांना घेऊन पुढील प्रवास करीत होत्या. त्यासाठी प्रवाशांना बसण्यासाठी येथे शेडही आहेत. मात्र त्यांची झालेली दुरवस्था, दुरूस्तीकडे झालेले दुर्लक्ष, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे हे बसस्थानक अलिकडे दुर्लक्षित झाले आहे. याचा फायदा खासगी वाहनचालकांनी उचलला असून त्यांनी आता पूर्णपणे त्यावर कब्जा मिळवला आहे.www.konkantoday.com